Press "Enter" to skip to content

जैन मुनींच्या स्वागतासाठी मोडले सोशल डीस्टन्सिंगचे नियम, व्हायरल्सचा दावा खरा

सध्या सोशल मिडीयावरील काही व्हायरल व्हिडीओज आणि फोटोजच्या आधारे जैन मुनींच्या स्वागतासाठी आलेल्या लोकांनी गर्दी करत सोशल डीस्टन्सिंगला हरताळ फासल्याचा दावा केला जातोय. या फोटोजमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी आपण बघू शकता. सदर फोटोज आणि व्हिडीओज मध्य प्रदेशातील असल्याचं बोललं जात आहे.

Advertisement

कुणी ‘यह तब्लीगी जमात की तरह कोई जिहाद नहीं है. यह जैन समुदाय के लोग है’ असं कॅप्शन ठेवलंय तर कुणी “भाजपाशासित मध्यप्रदेशातील जैन मुनी प्रमाणसागर हे बांदा नावाच्या गावात आले असतानाचे हे फोटोज आणि व्हिडीओज असल्याचे दावे करत आहेत.

पडताळणी:

‘चेकपोस्ट मराठी’ने या व्हायरल होत चाललेल्या फोटोज आणि व्हिडीओची पडताळणी करायला घेतली, त्यावेळी सर्वप्रथम आम्हाला ANI या वृत्तसंस्थेचा लोगो असणारा एक फोटो दिसला. त्याआधारे हा फोटो ANI चा असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आम्ही ANI च्या वेबसाईटवर थोडसं संशोधन केलं. वेबसाईटच्या होम पेजवरच आम्हाला या प्रकरणाशी संबंधित बातमी सापडली.

‘मध्यप्रदेशातील ‘सागर’ या ठिकाणी जैन मुनींच्या स्वागताला गर्दी गोळा होऊन सोशल डीस्टन्सिंगच्या नियमांना हरताळ फासला गेला’ या शीर्षकाखाली ANI ने बातमी दिलेली होती. या बातमीनुसार दि. १२ मे रोजी जैन मुनी प्रमाणसागर मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातल्या बांदा नावाच्या गावात गेले होते.

प्रमाणसागर याचं बांद्यामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी गोळा झाली होती. स्वतः प्रमाणसागर आपल्या २० अनुयायांसह गावात डेरेदाखल आले होते. या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरु असून जर सोशल डीस्टन्सिंगचे नियम तोडले गेले असतील तर तपास करून कलम १४४ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत”अशी माहिती सागर जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी प्रवीण भुरिया यांनी दिली.

वस्तुस्थिती:

दाव्याची पडताळणी करताना मिळालेली ANI वृत्तसंस्थेची बातमी आणि त्यामध्ये घटना स्थळाचे इन्चार्ज सागर जिल्ह्याचे सहाय्यक पोलीस अधिकारी प्रवीण भुरिया यांनी बातमीला दिलेला दुजोरा यावरून हे स्पष्ट स्पष्ट होते की सोशल मीडियात व्हायरल व्हिडीओज आणि फोटोज सोबत केलेला दावा खरा आहे. जैन मुनींच्या स्वागताला सोशल डीस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवत गर्दी जमली होती. त्यामुळे या दाव्याला आम्ही ‘चेकपोस्ट’वर आडवू शकत नाहीत.

हे ही वाचा – रतन टाटांच्या नावाने उद्योजकांना देण्यात आलेला उभारीचा संदेश फेक!

More from धर्म-संस्कृतीMore posts in धर्म-संस्कृती »

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published.

× न्यूज अपडेट्स मिळवा